Taleemi Samandar

Taleemi Samandar
Education

Tuesday, 12 January 2021

NISHTHA MODULE TIME TABLE For URDU MEDIUM / NISHTHA TRAINING TIME TABLE FOR URDU/ निष्ठा मॉडेल टाइम टेबल उर्दु मेडीयम करीता

 निष्ठा मॉडेल टाइम टेबल  उर्दू मीडियम के लिये.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ऑनलाइन लिस्ट प्रशिक्षण सन 2020-21 मॉडेल निहाय वेळापत्रक. खालील प्रमाणे देण्यात येत आहे यामध्ये उर्दू मेडीयम याचा समावेश आहे. तयार करण्यात आलेल्या अठरा मॉडेल मार्च महिन्याच्या 20 तारीख पर्यंत पूर्ण करायचे आहे. चुकून राहिले कोणतेही मॉड्यूल 21 मार्चपासून  4 एप्रिल पर्यंत करू शकतात

NISHTHA MODULE TIME TABLE FOR HINDI AND ENGLISH MEDIUM / NISHTHA TRAINING TIME TABLE FOR HINDI AND ENGLISH/ निष्ठा मॉडेल टाइम टेबल हिंदी व इंग्रजी मेडीयम करीता

 निष्ठा मॉडेल टाइम टेबल  हिंदी और इंग्लिश मीडियम के लिये.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ऑनलाइन लिस्ट प्रशिक्षण सन 2020-21 मॉडेल निहाय वेळापत्रक. खालील प्रमाणे देण्यात येत आहे यामध्ये इंग्लिश मीडियम आणि हिंदी मेडीयम याचा समावेश आहे. तयार करण्यात आलेल्या अठरा मॉडेल फेब्रुवारी महिन्याच्या 26 तारीख पर्यंत पूर्ण करायचे आहे. चुकून राहिले कोणतेही मॉड्यूल एक मार्चपासून 15 मार्च पर्यंत करू शकतात.

बालचित्रकला 2021 मध्ये मोठे बदलाव 15 जानेवारी पर्यंत अपलोड करू शकतात ड्रॉईंग शीट.

बालचित्रकला 2021 मध्ये मोठे  बदलाव 15 जानेवारी पर्यंत अपलोड करू शकतात ड्रॉईंग शीट.

Friday, 8 January 2021

प्रजासत्ताक दिनाबाबत मार्गदर्शक सूचना(2021) मधे प्रजासत्ताक कसा साजरा करायचे ...How to celebrate 26 January Republic Day in 2021- due to covid_19 issues

प्रजासत्ताक दिनाबाबत मार्गदर्शक सूचना(2021) मधे प्रजासत्ताक कसा साजरा करायचे ...How to celebrate 26 January Republic Day in 2021- due to covid_19 issues

 प्रजासत्ताक दिवस खालील दील्याल्या सुचना अनुसार साजरा करावा 2021 साठी मार्ग दर्शन सूचना...

Tuesday, 5 January 2021

श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2020-21’ च्या ऑनलाईन आयोजनाबाबत.* BMC SCHOOL DRAWING COMPETITION 2021

 बृहन्मुंबई महानगरपालिका – शिक्षण विभाग

 शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय, त्रिवेणी संगम मनपा शाळा इमारत, 

महादेव पालव मार्ग, करी रोड (पूर्व), मुंबई – 400012.  

क्र. आयईओ/ओडी/455 ,दि.01.01.2021 

               परिपत्रक

प्रति, 

विभागीय शिक्षण उपसंचालक , मुंबई विभाग, मुंबई 

2) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई – दक्षिण/ पूर्व/ पश्चिम

3) उपशिक्षणाधिकारी, खाजगी, माध्यमिक, शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे

प्रशासकीय अधिकारी (शाळा), ए ते टी विभाग

विभाग निरीक्षक (शाळा), सर्व माध्यमे

मुख्याध्यापक, 

   सर्व भाषिक म.न.पा./ खाजगी अनु./ विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा यांस.


 *विषय - मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान  बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2020-21’ च्या ऑनलाईन आयोजनाबाबत.*   



                                                               

बृहन्मुंबई क्षेत्रातील महानगरपालिकेतर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘ जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबईतील विविध 45 उद्याने/मैदानांवर केले जाते व सदर स्पर्धेत मुंबई महानगरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी होतात.

परंतू या वर्षी कोविड-19 प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्याने यावर्षी सदर विद्यार्थीप्रिय स्पर्धा रविवार दि. 10.01.2021 रोजी ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली आहे. 

बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व भाषिक मनपा प्राथमिक, माध्यमिक व खाजगी अनु./ विनाअनुदानित शाळांतील चित्रकलेची आवड असणा-या इ. 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता मुंबईसंदर्भात माझे मत, माझी जबाबदारी व कर्तव्य या बाबत जाणीव निर्माण व्हावी म्हणून 4 गटात खुली ऑनलाईन चित्रकला स्पर्धा रविवार दि. 10.01.2021 रोजी आयोजित केली असून सकाळी 9 ते 12 या वेळेत चित्र काढून सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. 


 *स्पर्धेचे नियोजन* :-

दि. 01 जानेवारी 2021 ते दि. 10 जानेवारी 2021 पर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे नावनोंदणी करावयाची आहे. 

  नावनोंदणी साठी विद्यार्थ्यांकडे स्वत:चा किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक व e-mail id ही माहीती असणे अत्यावश्यक आहे.

स्पर्धेसाठीचे गट खालीलप्रमाणे आहेत.

गट क्र. 1 – इ. 1 ली व 2 री गट क्र. 2 – इ. 3 री ते 5 वी

गट क्र. 3 – इ. 6 वी ते 8 वी गट क्र. 4 – इ. 9 वी व 10 वी 

स्पर्धेसाठीचे विषय:- रविवार दि. 10.01.2021 रोजी सकाळी 8 वाजता www.balchitrakala.com या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. प्रत्येक गटासाठी तीन विषय निश्चित केलेले असून त्यापैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढावयाचे आहे.  

पेपर आकार :- A3 किंवा A4 आकाराच्या कागदावर गटानुसार चित्र काढावे. चित्राच्या समोरील बाजूस आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, मोबाईल नंबर व गट क्रमांक इंग्रजी किंवा मराठी भाषेतच लिहावा. सदर माहीती लिहीली नसल्यास चित्र परिक्षणासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पूर्ण केलेले चित्र त्याचदिवशी म्हणजेच रविवार, दि. 10.01.2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.

चित्र अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे आहे.  

सदर स्पर्धा ही पूर्णपणे नि:शुल्क आहे.   


 *पारितोषिके* 

1 प्रथम पारितोषिके    गट 4 X रु. 25,000/-

रु.1,00,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

2 प्रथम पारितोषिके    गट 4 X रु. 20,000/-

रु.80,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

3 प्रथम पारितोषिके    गट 4 X रु. 15,000/-

रु.60,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

4 उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रती गट 10 X 4X रु.5,000/-)

रु.2,00,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे चार गटात 20 याप्रमाणे एकूण 25 वॉर्डमध्ये 500 उत्तम चित्रांना प्रत्येकी रु. 500 याप्रमाणे रु. 2,50,000/- ची रोख पारितोषिके अशी एकूण रोख पारितोषिकांची रक्कम रु. 6,90,000/-आहे.


आपल्याला स्पर्धेसंबंधी काही अडचण उद्भवल्यास *खालील क्रमांकावर संपर्क* साधावा. 



A, B, C, D,E, F/S

श्री. सचिन पाटील

9892488259

श्री. मुकेश भगत

9819117461


F/N,  G/N, 

G/S

श्री. आकाशनंद हिरवे

7506089688

श्रीम. पूनम वाघमोडे

9004237772


   K/E, K/W,

H/E,  H/W

श्री. निनाद पाटील

9867808650

श्री. भूषण उदगीरकर

9987173420


P/S,  P/N,   R/S, R/C, R/N

श्री. दिपक चौधरी

9324902071

श्री. शाम चव्हाण

8080262693


L,  M/W, 

M/E - 1, M/E - 2

श्री. सुरेश महामुनी

9702980974

श्री. दिनेश परदेशी

9702694622


N, S, T

श्री. प्रमोद महाजन

9819853305

श्री. सुधीर देवकते

9967499593





स्पर्धा समिती:- सर्व वॉर्डातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील याकरीता उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक (शाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी (शाळा) हे संबंधित वॉर्डचे स्पर्धाप्रमुख म्हणून काम पाहतील; तसेच त्यांना सहाय्यक म्हणून विभाग निरीक्षक (शाळा), कनिष्ठ पर्यवेक्षक (शा.शि.), शहर साधन केंद्र क्र. 1 ते 12 विषयतज्ञ, इमारत प्रमुख व मुख्याध्यापक / वरिष्ठ शिक्षक हे काम पाहतील व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता Virtual Meeting  (Zoom / Google Meeting) घेऊन संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

  इमारत प्रमुख व मुख्याध्यापक / वरिष्ठ शिक्षक यांना विद्यार्थी सहभागाकरीता तसेच तांत्रिक      साहाय्याकरीता सर्व वर्ग शिक्षक, सर्व स्पेशल शिक्षक़ व सर्व स्काऊट/गाईड शिक्षक सहकार्य करतील. ज्या मनपा विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन सुविधा नसेल, त्यांची नावनोंदणी वर्गशिक्षकांनी आपल्या मोबाईलद्वारे करुन स्पर्धेच्या दिवशी त्यांची चित्रे सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील संकेतस्थळावर अपलोड करण्यास मार्गदर्शन व सहकार्य करावे. यासाठी शिक्षक मित्र, पालक मित्रांची; तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे. 

पारितोषिक वितरण समारंभ:- पारितोषिक वितरण समारंभाची तारीख व स्थळ यथावकाश कळविण्यात येईल.

स्पर्धा प्रसिद्धी:- मान. महापौर यांच्या सभेत निर्णय झाल्यानुसार स्पर्धेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी कला विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले स्पर्धेचे भित्तीपत्र व परिपत्रक शहर साधन केंद्रातून प्राप्त करून ते आपल्या शाळेच्या प्रदर्शनी भागात लावावे.



 (दिनकर पवार)

प्राचार्य (प्र.) कला   


 (राजू तडवी)                            

  उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती)     


(महेश पालकर)

शिक्षणाधिकारी

Monday, 4 January 2021

*अनुकंपावर नियुक्ती संबंधित मा.माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.नाशिक यांचे अत्यंत महत्वाचे परिपञक*

 *अनुकंपावर नियुक्ती संबंधित मा.माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.नाशिक यांचे अत्यंत महत्वाचे परिपञक*




how to make students results in 2021/for teachers

Click here for download results sheet  कोरोना  वायरस मुळे  आपल्या  1 ते 8 च्या  संकलित चाचणी क्रमांक 2 रद्द  झाल्यामुळे  आकारिक ...