बृहन्मुंबई महानगरपालिका – शिक्षण विभाग
शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय, त्रिवेणी संगम मनपा शाळा इमारत,
महादेव पालव मार्ग, करी रोड (पूर्व), मुंबई – 400012.
क्र. आयईओ/ओडी/455 ,दि.01.01.2021
परिपत्रक
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक , मुंबई विभाग, मुंबई
2) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई – दक्षिण/ पूर्व/ पश्चिम
3) उपशिक्षणाधिकारी, खाजगी, माध्यमिक, शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे
प्रशासकीय अधिकारी (शाळा), ए ते टी विभाग
विभाग निरीक्षक (शाळा), सर्व माध्यमे
मुख्याध्यापक,
सर्व भाषिक म.न.पा./ खाजगी अनु./ विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा यांस.
*विषय - मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2020-21’ च्या ऑनलाईन आयोजनाबाबत.*
बृहन्मुंबई क्षेत्रातील महानगरपालिकेतर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘ जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबईतील विविध 45 उद्याने/मैदानांवर केले जाते व सदर स्पर्धेत मुंबई महानगरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी होतात.
परंतू या वर्षी कोविड-19 प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्याने यावर्षी सदर विद्यार्थीप्रिय स्पर्धा रविवार दि. 10.01.2021 रोजी ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली आहे.
बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व भाषिक मनपा प्राथमिक, माध्यमिक व खाजगी अनु./ विनाअनुदानित शाळांतील चित्रकलेची आवड असणा-या इ. 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता मुंबईसंदर्भात माझे मत, माझी जबाबदारी व कर्तव्य या बाबत जाणीव निर्माण व्हावी म्हणून 4 गटात खुली ऑनलाईन चित्रकला स्पर्धा रविवार दि. 10.01.2021 रोजी आयोजित केली असून सकाळी 9 ते 12 या वेळेत चित्र काढून सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.
*स्पर्धेचे नियोजन* :-
दि. 01 जानेवारी 2021 ते दि. 10 जानेवारी 2021 पर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे नावनोंदणी करावयाची आहे.
नावनोंदणी साठी विद्यार्थ्यांकडे स्वत:चा किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक व e-mail id ही माहीती असणे अत्यावश्यक आहे.
स्पर्धेसाठीचे गट खालीलप्रमाणे आहेत.
गट क्र. 1 – इ. 1 ली व 2 री गट क्र. 2 – इ. 3 री ते 5 वी
गट क्र. 3 – इ. 6 वी ते 8 वी गट क्र. 4 – इ. 9 वी व 10 वी
स्पर्धेसाठीचे विषय:- रविवार दि. 10.01.2021 रोजी सकाळी 8 वाजता www.balchitrakala.com या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. प्रत्येक गटासाठी तीन विषय निश्चित केलेले असून त्यापैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढावयाचे आहे.
पेपर आकार :- A3 किंवा A4 आकाराच्या कागदावर गटानुसार चित्र काढावे. चित्राच्या समोरील बाजूस आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, मोबाईल नंबर व गट क्रमांक इंग्रजी किंवा मराठी भाषेतच लिहावा. सदर माहीती लिहीली नसल्यास चित्र परिक्षणासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
पूर्ण केलेले चित्र त्याचदिवशी म्हणजेच रविवार, दि. 10.01.2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.
चित्र अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे आहे.
सदर स्पर्धा ही पूर्णपणे नि:शुल्क आहे.
*पारितोषिके*
1 प्रथम पारितोषिके गट 4 X रु. 25,000/-
रु.1,00,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
2 प्रथम पारितोषिके गट 4 X रु. 20,000/-
रु.80,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
3 प्रथम पारितोषिके गट 4 X रु. 15,000/-
रु.60,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
4 उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रती गट 10 X 4X रु.5,000/-)
रु.2,00,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे चार गटात 20 याप्रमाणे एकूण 25 वॉर्डमध्ये 500 उत्तम चित्रांना प्रत्येकी रु. 500 याप्रमाणे रु. 2,50,000/- ची रोख पारितोषिके अशी एकूण रोख पारितोषिकांची रक्कम रु. 6,90,000/-आहे.
आपल्याला स्पर्धेसंबंधी काही अडचण उद्भवल्यास *खालील क्रमांकावर संपर्क* साधावा.
A, B, C, D,E, F/S
श्री. सचिन पाटील
9892488259
श्री. मुकेश भगत
9819117461
F/N, G/N,
G/S
श्री. आकाशनंद हिरवे
7506089688
श्रीम. पूनम वाघमोडे
9004237772
K/E, K/W,
H/E, H/W
श्री. निनाद पाटील
9867808650
श्री. भूषण उदगीरकर
9987173420
P/S, P/N, R/S, R/C, R/N
श्री. दिपक चौधरी
9324902071
श्री. शाम चव्हाण
8080262693
L, M/W,
M/E - 1, M/E - 2
श्री. सुरेश महामुनी
9702980974
श्री. दिनेश परदेशी
9702694622
N, S, T
श्री. प्रमोद महाजन
9819853305
श्री. सुधीर देवकते
9967499593
स्पर्धा समिती:- सर्व वॉर्डातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील याकरीता उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक (शाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी (शाळा) हे संबंधित वॉर्डचे स्पर्धाप्रमुख म्हणून काम पाहतील; तसेच त्यांना सहाय्यक म्हणून विभाग निरीक्षक (शाळा), कनिष्ठ पर्यवेक्षक (शा.शि.), शहर साधन केंद्र क्र. 1 ते 12 विषयतज्ञ, इमारत प्रमुख व मुख्याध्यापक / वरिष्ठ शिक्षक हे काम पाहतील व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता Virtual Meeting (Zoom / Google Meeting) घेऊन संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
इमारत प्रमुख व मुख्याध्यापक / वरिष्ठ शिक्षक यांना विद्यार्थी सहभागाकरीता तसेच तांत्रिक साहाय्याकरीता सर्व वर्ग शिक्षक, सर्व स्पेशल शिक्षक़ व सर्व स्काऊट/गाईड शिक्षक सहकार्य करतील. ज्या मनपा विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन सुविधा नसेल, त्यांची नावनोंदणी वर्गशिक्षकांनी आपल्या मोबाईलद्वारे करुन स्पर्धेच्या दिवशी त्यांची चित्रे सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील संकेतस्थळावर अपलोड करण्यास मार्गदर्शन व सहकार्य करावे. यासाठी शिक्षक मित्र, पालक मित्रांची; तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे.
पारितोषिक वितरण समारंभ:- पारितोषिक वितरण समारंभाची तारीख व स्थळ यथावकाश कळविण्यात येईल.
स्पर्धा प्रसिद्धी:- मान. महापौर यांच्या सभेत निर्णय झाल्यानुसार स्पर्धेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी कला विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले स्पर्धेचे भित्तीपत्र व परिपत्रक शहर साधन केंद्रातून प्राप्त करून ते आपल्या शाळेच्या प्रदर्शनी भागात लावावे.
(दिनकर पवार)
प्राचार्य (प्र.) कला
(राजू तडवी)
उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती)
(महेश पालकर)
शिक्षणाधिकारी
No comments:
Post a Comment